इंदापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून पाहणी..

| इंदापूर / महादेव बंडगर | बुधवार दि. 14 सप्टें. रोजीच्या चक्रीवादळाने व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निमगाव केतकी, सणसर येथे प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकऱ्यांना धीर दिला असून आणि शासन दरबारी मदतीसाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. मागील काही दिवसांपासून पुणे जिल्हा आणि इंदापूर तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उजनी व वीर धरणांमधून जवळपास 2 लाख क्यूसेक ने पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात आले होते. या विसर्गाचा फटका नीरा व भीमा नदी संगमावरील नरसिंहपूर या गावालाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. गावामध्ये पाणी शिरुन संसारोपयोगी वस्तूंचे तसेच घरांचे, शेतांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संकटामध्ये राज्यमंत्री ना. दत्तात्रय (मामा) भरणे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आज नरसिंहपूर येथेही जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. आणि प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

निसर्गाच्या प्रकोपा समोर कोणाचेच काही चालत नाही मात्र आपण सर्वांनी अनेक संकटांना तोंड दिले आहे तशाच प्रकारे या संकटालाही धिराने सामोरे जाऊ, शासनाची मदती निश्चितच सर्व शेतकरी बांधवांना मिळेल असेही भरणे यांनी सांगितले. कालच्या पावसाने मदनवाडी गावाच्या तलावाशेजारील सांडावा फुटल्याने तलावाच्या शेजारील घरांचे तसेच तलावाच्या खालील ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांची जनावरे पुराच्या पाण्यात वाहुन गेली आहेत. तर काहींच्या घरात पाणी शिरून होत्याचे नव्हते झाले आहे. शेतकऱ्यांनी काढून ठेवलेली बाजरी, मका, सोयाबीन सारखी पिके वाहून गेली आहेत.

मदनवाडी तलावाचे खोलीकरण करण्यात आल्याने १५० हेक्टरच्या तलावात अतिरिक्त पाणी साठले होते. रात्री पावसाचा जोर वाढल्याने तलावाच्या भराव्या शेजारील सांडाव्याची ५० ते ६० फुट भिंत वाहुन गेल्याने मदनवाडी ओढ्याच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विभागीय कृषी अधिकारी ताटे यांनी भेटी दिल्या यावेळी पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *