| ठाणे | ठाणे महापालिका चांगले काम करीत असून कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. १५ ऑगस्टनंतर शहरातील सम-विषमनुसार ज्या आस्थापना सुरू होत्या, त्या सर्व आस्थापना राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत दररोज सुरू ठेवण्याच्या तसेच मॉल्स, मार्केट, जिम व स्विमिंग पूलबाबत आढावा घेऊन त्यानंतर निर्णय घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी महापालिका प्रशासनास केल्या.
कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर ठामपाच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या बैठकीत पालकमंत्री बोलत होते.
ठाणे महापालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के असून रुग्णदुपटीचा वेगही ९० दिवसांवर पोहोचला आहे. मृत्यूचे प्रमाण हे ३.५ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांवर आले आहे. ठाणे महापालिका सातत्याने करीत असलेल्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले आहे, असे सांगून पालकमंत्र्यांनी आयुक्त आणि मनपा प्रशासनाचे कौतुक केले.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .