| ठाणे | अंजुषा अनिल पाटील यांना A Study of Mental Health And Home Environment Of Student या विषयात पी.एच.डी पदवी यु. जी. सी. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली आहे. अंजुषा पाटील यांनी ठाणे महानगरपालिकेत शिक्षक, मुख्याध्यापिका, केन्द्रप्रमुख, गटप्रमुख अशी महत्त्वाची पदे भूषविली आहेत.
ठाणे महापालिकेच्या सेवेतून त्या नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या आहेत. त्यांनी दैनिक ठाणे वार्ता, दैनिक लोकमत, दै प्रत्यक्ष, अचूकवार्ता साप्ताहिक अश्या नामवंत वर्तमानपत्रात लेखन त्यांनी केले आहे. त्यांना ठाणे महानगरपालिका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला असून अनेक संस्थांकडून त्यांचा गौरव झालेला आहे. शारदा प्रकाशनतर्फे ‘लिहिता लिहिता’, व व्यास क्रिएशनतर्फे ‘गूज मनीचे’ व ‘ओंजळ’ ही तीन पुस्तके प्रकाशित झाली असून चार पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. अंजुषा पाटील यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
दरम्यान , शिक्षण उपायुक्त मनीष जोशी, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, लेखाधिकारी अजित धुरी, गटाधिकारी संगीता बामणे, अस्लम कुंगळे यांनी प्रशासनाकडून तर ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुनील फापाळे, ठाणे पालघर शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष तथा संचालक बाबाजी फापाळे, संचालक प्रकाश गायकवाड, संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र निकम, जगन जाधव, राजेंद्र बामणे, एक्का फाउंडेशनचे प्राजक्त झावरे पाटील, सचिन घोडे, विकास चव्हाण, किरण लहामटे आदी यांनी देखील त्यांच्या प्राविण्याबद्दल अभिनंदन केले आहे.
✓ ” प्रत्येक मूल समान असते. तरीसुद्धा काही मुलं अभ्यासात मागे पडतात. आमची ठाणे महानरपालिकेची मुलं सर्व क्षेत्रात अग्रेसर असताना विशिष्ट कुटुंबातील मुलः अभ्यासात मागे पडतात. कला, क्रीडा या विषयात पुढे असतात. हे लक्षात आल्यावर बालकांच्या समस्येवर संशोधन सुरु केल. ठाणे मनपाच्या हद्दीतील सर्व शाळांचा सर्व्हे केला. त्यातून काही शाळा निवडून शिक्षक, विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. मुलाखती घेऊन प्रश्नावल्या सोडवून घेतल्या. त्यातून प्रबंधाने आकार घेतला. तब्बल ३८० पानांचा प्रबंध सादर करून या विषयातील डाॕक्टरेट पदवी मला प्राप्त झाली. “
– डॉ. अंजूषा पाटील
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .