| सोलापूर / महेश देशमुख | अतिवृष्टीमुळे माढा तालुक्यातील शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरसरकट आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड माढा तालुक्याच्या वतीने प्रांताधिकारी कुर्डूवाडी यांच्याकडे करण्यात आली.
शेती पिकाच्या नुकसानी बाबत विलंब न करता सरसकट मदत जाहीर करावी व त्याची लवकर अंमलबजावणी व्हावी तसेच पंचनामे करताना निष्काळजीपणा करणारे अधिकारी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी यावेळी प्रांताधिकारी कुर्डूवाडी यांच्याकडे करण्यात आली. याप्रसंगी राज्य प्रवक्ते व्याख्याते हर्षल बागल, जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल गवळी, माढा तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, कार्याध्यक्ष कैलास कणसे उपस्थित होते.
शेतकरी संकटात असताना नापिकी, कर्जबाजारीपणा आणि कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिकदृष्टया शेतकरी कोलमडला गेला असल्याचे चित्र आहे. त्यामध्येच आता शेतकर्यांवर अतिवृष्टीची अवकृपा झाली आहे. या संकटामधून शेतकर्यांना वाचवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मदत केली पाहिजे असे तालुकाध्यक्ष संतोष शिंदे यांनी सांगितले.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .