प्राधान्याने जूनी पेन्शन हक्क संघटनेच्या मागण्यांची पूर्तता करावी, वित्त व लेखा अधिकारी यांचे शिक्षणाधिकारी यांना आदेश

| पुणे | डी.सी.पी.एस चे एनपीएस मध्ये रुपांतर करण्यासाठी चालू असेलेले प्रत्येक डी.सी.पी.एस धारक शिक्षकांकडून एनपीएसचे फॉर्म भरुन घेणे थांबवावे व पुणे जिल्हा जूनी पेन्शन हक्क संघटनने सादर केलेल्या मागण्यांची पूर्तता करावी असे आदेश मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांनी शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना आदेशित केले आहे.

१ नोव्हेंबर २००५ नंतरच्या प्राथमिक शिक्षकांना लागू असलेल्या डीसीपीएस योजनेचे एनपीएस योजनेत रुपांतर करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, यासाठी प्राथमिक शिक्षकांकडून शालार्थ अंतर्गत फॉर्म भरुन घेतले जात आहेत, डी.सी.पी.एस मधील कपात रक्कमांचा हिशोब जुळत नाही, शासन हिस्सा व व्याज यांचा मेळ लागत नाही, कित्येक शिक्षकांची कपात झाली आहे , परंतु त्यांचे डीसीपीएस खातेच नाही, ज्यांना हिशोब चिठ्ठया दिल्या आहेत; त्यांच्या हिशोबाचा व कपात रकमेचा ताळमेळ नाही असे जूनी पेन्शन हक्क संघटनने वित्त व लेखा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

एनपीएस योजना लागू होणार आहे तिचे स्वरूप, कार्यपद्धती याची कोणतीच माहिती शिक्षकांना देण्यात आली नाही, तसेच सदर योजना केंद्राच्या धर्तीवर असणार की तिचे स्वरुप कसे असणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही या सर्व शंकांचे समाधन व त्रुटींचे निराकरण करावे असे वित्त व लेखा अधिकाऱ्यांनी आदेशित केले आहे.

डीसीपीएस मधील रकमांचा हिशोब व एनपीएस बाबत स्पष्टता, लाभ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एनपीएस फॉर्म भरले जाणार नसल्याची भूमिका पुणे जिल्हा पेन्शन हक्क संघटनेने घेतली असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष गदादे व सरचिटणीस वैभव सदाकाळ यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published.