बीएलओचे काम ऐच्छिक असताना सक्ती कशाला ? मराठीमाती प्रतिष्ठानचा निवडणूक आयोगास सवाल !

| पुणे : विनायक शिंदे | राज्यातील शिक्षकांना प्रत्यक्ष निवडणूक कामांव्यतिरिक्त मतदार यादी संबंधी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी ( बूथ लेव्हल ऑफिसर – बी.एल.ओ. ) काम करणे ऐच्छिक असल्याचे निवेदन एक्का फाऊंडेशन संचलित मराठीमाती प्रतिष्ठानच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना दिले.

लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणूकांची प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या मतदार याद्यांचे संशोधन, दुबार मतदार, मयत मतदार, मतदार ओळखपत्र वाटप, ऑनलाईन मतदार नोंदणी पडताळणी असे विविध कामे मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांमार्फत केले जातात.

संपूर्ण राज्यात बीएलओचे काम प्राथमिक शिक्षकांच्या माध्यमातून निवडणूक आयोग करवून घेतले जाते. प्राथमिक शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामांबरोबरच बीएलओचे काम लादले गेल्याने समस्त शिक्षक वर्गामध्ये नाराजी होती.

शिक्षकांना शिक्षणाचा हक्क कायदा २००९ नुसार आपत्ती व्यवस्थापन , विधानसभा, लोकसभेची प्रत्यक्ष निवडणूक अशीच कामे करणे बंधनकारक असताना वर्षभर सतत चालू असणारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे काम लादल्याने काही शिक्षकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. शिक्षकांना मतदार यादीचे काम करण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही, शिक्षकास स्वेच्छेने मतदार यादी चे काम करत असल्यास त्यांना करता येईल. त्यावर कोणालाही आक्षेप घेता येणार नाही. तसेच जे शिक्षक मतदार यादीचे काम नाकारतील त्यांच्या विरूध्द शिस्तभंगाची कारवाई करता येणार नाही, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत.

https://twitter.com/iamprajakt/status/1336563235852492801?s=19

मराठीमाती प्रतिष्ठानने मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना आदेशित करावे अशी विनंती केली आहे. मराठी माती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राजक्त झावरे पाटील यांनी याबाबतची माहिती दैनिक लोकशक्तीला दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *