| पुणे / महादेव बंडगर | कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने पदोन्नतीचे आरक्षण हा आमचा संविधानिक अधिकार आहे आणि तो आम्हांला मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी महाराष्ट्र विधानसभेतील सर्व मंत्र्यांना भेटून निवेदने दिली. त्याच बरोबर जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी एक दिवसाचे आंदोलन केले दि. ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर नागपूर ते मुंबई लॉंगमार्च काढण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. त्याची पूर्व कल्पना शासनालाही दिली होती.
मंत्री छगन भुजबळ यांची अरुण गाडे यांनी नाशिक येथे भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मंत्री मंडळात चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. मंत्री गटाची स्थापना करण्यात यावी असा प्रस्ताव शासनाकडे कास्ट्राईबच्या वतीने मांडला होता. आणि अखेर आज महाराष्ट्र शासनाने मंत्री गटाची स्थापना केली आहे, अशी माहिती शिक्षक आघाडीचे राज्य महासचिव गौतम कांबळे यांनी दिली.
पदोन्नतीच्या आरक्षणाचा संघर्ष अजुन संपलेला नाही. परंतु आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनावर दबाव आणून आपल्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यात कास्ट्राईब यशस्वी झाली आहे. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ संघटनेच्या बैठकीत पदोन्नतीच्या आरक्षणाचा प्रश्न प्राधान्यक्रमाने मांडला होता. त्यावेळी मा.मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
पदोन्नतीचे आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी प्रसंगी आपल्याला जनआंदोलन करावे लागेल. तेव्हा सर्व मागासवर्गीय कर्मचाऱ्यानी मा.अरुण गाडे यांच्या नेतृत्वाखालील कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे जाहीर आवाहन अध्यक्ष अरुण गाडे यांनी केले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .