| मुंबई | राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मंत्रिमंडळात खांदेपालट करण्यात येणार असून नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता आहे. त्यात नाथाभाऊ खडसे यांचा देखील समावेश असू शकतो अशी सूत्रांची माहिती आहे.
तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये खातेबदल होणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेकडे गृहनिर्माण खातं दिलं जाण्याचीही शक्यता आहे. तर त्याबदल्यात कृषीसह एक वाढीव मंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला जाऊ शकतं. गृहनिर्माण, कृषी, रोजगार हमी, उत्पादन शुल्क, कामगार , अल्पसंख्यांक या खात्यांमध्ये खांदेपालट होणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन नव्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असंही समजते. त्यामुळे या दोन्ही पक्षातील मंत्रिमंडळात सामील होणार हे नवे चेहरे कोण, याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, एकीकडे राज्य सरकार अस्थिर असून केव्हाही सत्तापालट होऊ शकते, असा दावा भाजपकडून केला जात असतानाच महाविकास सरकारमध्ये मांत्र खांदेपालट होत आहे.
नव्या बदलानुसार सध्या राष्ट्रवादीकडे असणारं गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. जर खरोखरंच असा बदल झाला तर सध्या हे खातं ज्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आहे त्यांच्याकडे आगामी काळात नेमकी कोणती जबाबदारी दिली जाणार? याबाबतची चर्चा आता सुरू झाली आहे. तसंच शिवसेना या खात्यासाठी कोणत्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब करणार आणि नाथाभाऊ यांचा प्रवेश झाला तर त्यांना कोणते खाते मिळेल हेही पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .