राज्याचा रिकव्हरी रेट ८६% टक्क्यांवर, राजेश टोपेंची माहिती..!

| मुंबई | राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आज १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.६५ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साडे तेरा लाखांवर गेली असून राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन १ लाख ८५ हजार २७० एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८० लाख ६९ हजार १०० नमुन्यांपैकी १५ लाख ८६ हजार ३२१ नमुने पॉझिटिव्ह (१९.६६ टक्के) आले आहेत. राज्यात २३ लाख ९५ हजार ५५२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २३ हजार ७४९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *