| नवी दिल्ली | सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि औद्योगिक कामगारांचे वेतन ठरविण्यासाठीचे एकक म्हणून वापरण्यात येणाऱ्या ‘कन्झ्युमर प्राइस इंडेक्स-इंडस्ट्रियल वर्कर्स’ (सीपीआय-आयडब्ल्यू) या निर्देशांकात येत्या बुधवारी (२१ ऑक्टोबर) रोजी लेबर ब्युरोकडून सुधारणा करण्यात येणार आहे. या बदलामुळे केंद्र सरकारचे कर्मचारी औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि निवृत्तिवेतनधारकांना लाभ होईल.
नव्या मालिकेत संघटित क्षेत्रातील कामगारवर्गाच्या खर्चाच्या सवयी गृहीत धरल्या जाणार आहेत. सध्या २०११ हे सीपीआय-आयडब्ल्यूचे आधार वर्ष आहे. ते बदलून २०१६ करण्यात येणार आहे. देशाच्या श्रमशक्तीच्या बदललेल्या ग्राहक सवयी, सापेक्ष किमती आणि नवी खर्च शैली यांचा विचार करता सुधारणा करणे आवश्यक झाले आहे, असे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. महागाई निर्देशांकाचे पहिले वर्ष हे आधार वर्ष असते. त्याचे निर्देशांक मूल्य १०० गृहीत धरले जाते. त्यानुसार बदललेल्या किमतीवर महागाई भत्त्याचा टक्का काढला जातो.
नव्या ‘सीपीआय-आयडब्ल्यू’मध्ये बदलत्या उपभोक्ता शैलीचे प्रतिबिंब दिसून येईल. शिक्षण, आरोग्य, प्रवास आणि घरे या बाबींना अधिक महत्त्व दिले जाईल. २00१ ते २0१६ या काळात खर्चाचा पॅटर्न बदलला आहे. औद्योगिक कामगारांचा आपल्या मिळकतीतील खानपानावरील खर्च २00१ मध्ये तब्बल ४५ टक्के होता. तो घसरून ३६ टक्क्यांवर आला आहे. याउलट अखाद्य बाबींवरील खर्च आता वाढला आहे. यात शिक्षण, आरोग्य आणि प्रवास (पेट्रोल-डिझेल खर्चासह) यावरील खर्चाचा समावेश आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .