सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांची सूटका करावी; शेतकरी संघटना विभागीय अध्यक्ष हनुमंत वीर यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे !

| बारामती | बारामती परिसरात बँकाकडे तारण असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सावकारांनी शेतकऱ्यांना वेठीस धरून बेकायदेशीर पणे खरेदी करत बँकांची व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांची सूटका करावी असे निवेदन शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष हनुमंत वीर यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती महसूल उपविभागिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सावकारां कडून अनेक बेकायदेशीर कृत्ये चालू आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीच्या विकासासाठी, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पीकासाठी बँकांकडून विविध प्रकारची कर्जे घेतली आहेत. अलीकडच्या काळात नोटा बंदी , आयात निर्यात धोरणातील धरसोडपणा , दुष्काळ, अतिवृष्टी, हमी भावाचा अभाव, कोरोना महामारीचे संकट या विविध कारणांमुळे शेती धंदा तोटयात आला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोसळले आहे, बँकांच्या कर्जाचे हप्ते थकलेले आहेत. शेती कर्जाचे एनपीए वाढत चालल आहे, नवीन पिकासाठी भांडवलाची गरज आहे. बँकांच्या धोरणामुळ कर्ज मिळत नाही, पिकाचा व कौटुंबिक खर्च भागवण्यासाठी शेतकरी खाजगी सावकाराकडे जावे लागतआहे. सावकाराळून अवास्तव व्याजदराने शेतकऱ्यास कर्जपुरवठा होत आहे, वर्षा -सहा महिन्यात मुद्दलापेक्षा व्याज दुप्पट -तिप्पट होत आहे.

शेतकऱ्याकडून संबंधित सावकार दबाव टाकत शेतकऱ्याची बँकेकडे तारण असलेली शेतजमीन कायम खुश खरेदी करत आहेत. महसूल यंत्रणा या बेकायदेशीर कृत्यात सावकारांना साथ देत आहेत.
शेतकऱ्यांची व बँकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी व अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी जिल्हाधिकारांनी यांमध्ये लक्ष घालावे व शेतकऱ्यांची सावकारांच्या पाशातून सुटका करावी.

जिल्हाधिकाऱ्यांसोबत बँकर्स कमिटी बारामती उपविभाग, उपविभागिय पोलिस अधिकारी बारामती उपविभाग यांना निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत.
शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री. पांडूरंग रायते यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *