दिलासादायक – कमी झाले मुंबईतील कंटेनमेंट झोन..!



| मुंबई |महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये मुंबईनंतर पुण्याचा नंबर लागतो. पण ज्या परिसरात रुग्णांची संख्या होती तिथे कंटेनमेंट झोन बनवल्यामुळे कोरोनाचे संक्रमण रोखण्यास मदत झाली आहे.

आतापर्यंत मुंबईत कंटेनमेंट झोनची संख्या १ हजार ३६ पर्यंत पोहोचली होती. पण आता ही संख्या कमी होवून ८०५ वर आली आहे. म्हणजे आता मुंबईत कंटेनमेंट झोनची संख्या २३१ ने कमी झाली आहे. ही दिलासादायक बाब असली तरी नागरिकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. गेल्या १४ दिवसांपासून एकही नवा रूग्ण न सापडल्याने हे २३१ कंटेनमेंट झोन कमी करण्यात आले आहेत.

मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ हजार ४०७ इतका झाला आहे. येत्या १५ मे पर्यंत मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ७० हजारापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महानगपालिका आणि आरोग्य यंत्रणेकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

मुंबईतील २४ पैकी १७ वॉर्डमध्ये कोरोनाचे १०० पेक्षा अधिक रूग्ण आहेत. वरळीचा भाग येत असलेल्या जी दक्षिण विभागात आतापर्यंत सर्वाधिक ६०० रूग्ण तर ई विभागात ४६६ रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *