क्रिकेट – खेळाडूंना असा बसणार फटका..?



| मुंबई | आयपीएल सीझन २०२० साठी २०१९च्या डिसेंबरमध्येच खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली होती. ज्यामध्ये खेळाडूंवर कोट्यावधी रूपयांची बोली लावण्यात आली होती. परंतु, जर आयपीएल झालं नाही, तर या खेळाडूंना या सीझनसाठी एक रूपयाही दिला जाणार नाही. दरम्यान, हे खेळाडू पुढिल सीझनमध्ये फ्रेंचाइजीसाठी त्याच किमतीवर खेळतील. सर्वाधिक बोली लागलेल्या ५ खेळाडूंमध्ये पॅट कमिंस (१५.५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल (१०.७५ कोटी), क्रिस मोरिस (१० कोटी), शेल्डन कॉटरेल (८.५ कोटी) आणि नॅथन कुल्टर नाइल (८ कोटी) यांचा समावेश आहे.

दिग्गज खेळाडूंचं करिअर संपुष्टात?

वर्ल्डकप क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, जे नॅशनल टीममध्ये पुनरागमन करण्यासाठी आयपीएल २०२० वर अवलंबून होते. यामध्ये सर्वात पहिलं नाव येतं, ते म्हणजे, एमएस धोनी. त्यानंतर एबी डिविलियर्स, सुरेश रैना आणि दिनेश कार्तिक यांसारखे अनेक खेळाडू आहेत. जे आपल्या क्रिकेट करिअरला फुलस्टॉप लावण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान महेंद्र सिंह धोनीचे फॅन्स वर्ल्डकप २०१९ नंतरपासूनच धोनी मैदानावर कधी उतरणार याची वाट पाहत आहेत. जर यंदाचं आयपीएल पार पडलं नाही तर मात्र धोनीच्या फॅन्सना आणखी बरेच दिवस वाट पाहावी लागू शकते.

अश्या प्रकारे आर्थिक फटका तर खेळाडूंना बसणार आहेच, पण त्याहून काहींची कारकीर्द देखील संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *