व्यक्तिवेध : सरकारी कर्मचारी संघटनेतील प्रामाणिक नेतृत्व वितेश खांडेकर

सध्या सर्वत्र तरुण नेतृत्वाना संधी भेटत असून आपल्या परीने ही तरुण फळी आपले नाव प्रत्येक क्षेत्रात उमटवत आहे.! राजकारणातील आदित्य ठाकरे असतील, रोहित पवार असतील किंवा इतर क्षेत्रातील सुंदर पिचाई असतील.. आता तरुण आपल्या पिढीतील, आपल्या अधिक जवळच वाटणाऱ्या नेतृत्वाच्या शोधात आहेत.  निडरपणा, आक्रमकता, स्पष्ट उदिष्टे निश्चिता आदी अनेक गुण आणि वय यांची सांगड सध्या तरुण नेतृत्वात असल्याचे आपण पाहतच आहोत.! 

असेच एक तरुण नेतृत्व सरकारी कर्मचारी संघटनेत आपल्या कामाच्या जोरावर नावारूपाला आले आहे, ते म्हणजे वितेश खांडेकर.. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्याध्यक्ष…!

१ नों. २००५ पासून सरकारी सेवेत नोकरीस लागलेल्या सरकारी कर्मचारी यांना सरकारने जुनी पेन्शन योजना नाकारली असून त्यांना नवी अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. सदरची योजना सरकारी कर्मचारी यांच्यावर अन्याय करणारी असल्याच्या भावनेतून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत असंतोष होता. त्या असंतोषाला तोंड फोडून या प्रश्नाची धग अखंड पेटविण्यासाठी वितेश खांडेकर यांनी ‘ महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ची स्थापना २०१५ साली केली आणि आज संघटना महाराष्ट्रातील सर्वात मोठी व आक्रमक संघटना म्हणून उभी आहे.

वितेश खांडेकर यांचा जन्म तसा सामान्य कुटुंबातीलच तोही चंद्रपूर मधील खेडेगावात, शिक्षण देखील तिथेच झाले. त्यांनी शिक्षण घेताना देखील विद्यार्थी संघटना मध्ये काम केले होते. डीएड ची पदवी घेतल्यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेत त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली.. नक्षली आणि सोय सुविधांपासून वंचित असणाऱ्या क्षेत्रात कार्यरत असून देखील त्यांनी आपले अध्यापनाचे पवित्र कार्य तर चालूच ठेवले सोबत सरकारी कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी लढायला सुरवात केली.

आपले सहकारी सुनील दुधे, गोविंद उगले, बाजीराव मोढवे या मोजक्या सहकाऱ्यांनिशी त्यांनी एका अशक्यप्राय वाटणाऱ्या आणि ज्या प्रश्नापासून सर्वच संघटना कायम अंतर ठेवून होत्या असा प्रश्न आपण सोडवायचा असा संकल्पच सोडला.. तो प्रश्न म्हणजे १९८२-८४ ची पेन्शन योजना सर्वांना सरसकट लागू करावी..!

 हा प्रश्न पूर्ण आर्थिक बाबींशी निगडित आणि समजण्यास किचकट असल्याने आतापर्यंत राज्यात कोणतीच सरकारी कर्मचारी संघटना त्यावर ब्र काढत नव्हती, अश्या काळात या नवख्या पोरांनी हा विषय उचलला आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनची मुहूर्त मेढ रोवली. आता महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जवळपास ३४५ हुन अधिक तालुक्यांमध्ये संघटन उभे असून स्थानिक प्रश्नांनसह कर्मचाऱ्यांच्या सेवेत आहे. 

नागपूर मधील लाखोंचा आक्रोश मोर्चा असेल किंवा मुंबईतील भव्य धरणे आंदोलन किंवा मुंडण मोर्चा असेल किंवा अर्धनग्न आंदोलन किंवा प्रत्येक जिल्हास्तरावर चालू असणारी आंदोलने असतील ही सगळी आंदोलने संघटनेची ताकद दाखवण्यास पुरेशी आहेत.! फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून संघटन उभे राहिले अशी टीका करणाऱ्यांना ही संख्या डोळे दिपवणारी अशीच ठरली आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक संघटना वेगवेगळ्या मुद्यांवर लढत असताना वितेश खांडेकर यांची उभी केलेली ही संघटना एका वेगळ्याच पातळीवर दिमाखात उभी आहे.

खांडेकर यांनी हाती घेतलेला विषय अतिशय किचकट आणि कठीण असाच आहे. माझ्यासारखे पत्रकार या कडे तटस्थपणे पाहताना आणि अभ्यासताना हा प्रश्न अशक्यप्राय असा वाटत असला तरी खांडेकर व त्यांच्या टीमची इच्छा शक्ती पाहता , हा प्रश्न सुटेल अशी आशा देणाराही नक्की आहे. या संपूर्ण प्रवासात खांडेकरांना गोविंद उगले, सर्जेराव सुतार, प्रविण बडे, आशुतोष चौधरी, कुणाल पवार, अमोल शिंदे, गौरव काळे, नदीम पटेल, अमोल माने आमचे प्राजक्त झावरे पाटील आदी अनेकांचे खंबीर साथ लाभत असल्याने हे टीम वर्क इतरांपेक्षा अधिकचे क्रियाशील दिसत आहे. त्या सोबतच विभागप्रमुख, जिल्हाध्यक्ष, तालुका प्रमुख, केंद्र प्रमुख अशी पदाधिकारी मंडळी देखील जीव ओतून संघटनेत काम करत आहेत.

 प्रश्न किचकट आहे, परंतु नेतृत्व आक्रमक, अभ्यासू, मुद्देसूद मांडणी करून सहज भिडणारे आणि आपलस करणारे आहे, हे नव्याने कर्मचारी चळवळींना पुनर्जीवित करणारे आहे, असे म्हणायला हरकत नाही. 

आज वितेश खांडेकर यांचा जन्मदिवस त्यांना खूप शुभेच्छा..!

रामदास पाटील , बदलापूर

कळसुबाईवर महिलांना प्रवेशबंदीचा ‘तो’ फलक अखेर हटवला; पण लावला कोणी ?…………

आशिष कुडके :- अहमदनगर : महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई (सर करणे ही ट्रॅकर्ससाठी खूप आनंदाची गोष्ट असते. हिवाळा, उन्हाळा असो किंवा पावसाळा तिन्ही ऋतुंमध्ये ट्रेकर्सची पावलं भटकंतीसाठी फिरत असतात. गड-किल्ल्यांवरुन दिसणारे निसर्गाचे सुंदर रूप डोळ्यात साठवण्यासाठी ट्रेकर्स अतिशय मेहनतीने गड-किल्ले सर करतात. मात्र, अलीकडेच महिला ट्रेकर्सच्या भावना दुखावणारा एक प्रसंग समोर आला आहे. कळसूबाईच्या शिखराजवळ […]

0 comments

जग बदलणारी माणसं – बाबा आमटे

श्रध्येय बाबा आमटे यांची आज जयंती..! आपल्या कर्मसिद्धांताने जगभरात असंख्य कर्मवीर घडवणाऱ्या या चोफेर माणसाला विनम्र अभिवादन..! “अशी सृजनशील साहसे हवी आहेत की जी बीजे पेरून वाट पाहू शकतील उगण्याची… जी भान ठेवून योजना आखू शकतील आणि बेभान होऊन त्या योजना अंमलात आणतील…” अशा साहसी तरुणांना प्रेरणेचा शंख फुकवून त्यांच्या कणाकणात जाणिवा आणि कर्तव्याच्या ज्वाला […]

0 comments

जुन्या पेंशन चळवळीचा अजातशत्रू – बाजीराव मोढवे

तो काळ होता… पेंशन साठी संघटन असावे ह्या विचाराचा जोर संपुर्ण राज्यभर तुफान पकडत होता. तब्बल १० वर्षात कधीही जुन्या पेंशन सारख्या धगधगत्या विषयाला हात न लावण्याच्या धोरणामुळे आणि त्यातून विश्वासघात झाल्याच्या भावनेने जुन्या जाणत्या संघटनांच्या विरोधातील अविश्वाची भावना शिखरावर होती आणि त्यातुनचं युवकांच्या नव्या संघटनेची गरज आता संपुर्ण महाराष्ट्रात आहे हा विचार काही तरूणतुर्क […]

0 comments

5 Comments

  1. वितेश खांडेकर सर म्हणजे दमदार नेतृत्व.

  2. वितेश खांडेकर सर म्हणजे दमदार नेतृत्व.

  3. मतलबी है लोग यहॉं के मतलबी जमाना, ………….!?

  4. मतलबी है लोग यहॉं के मतलबी जमाना, ………….!?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *