शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदलीच्या शासन निर्णयामुळे दुर्गम भागातील प्राथमिक शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण..!

| पुणे | ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदली संदर्भात शास निर्गमित केला ,सन 2021-22 या शैक्षणिक वर्षांसाठी बदल्यांचे सुधारित धोरण दि. 7/4/2021 रोजी जाहीर केले. त्यामुळे दुर्गम क्षेत्रातील शिक्षकांच्या मध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून आता त्यांच्या स्वगृही जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

गेल्यावर्षी बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या, अनेक संघटनांचा जुन्या धोरणाला विरोध होता त्यामुळे प्रशासन आणि शिक्षक संघटना यात संघर्षाचे वातावरण तयार झाले होते. जेष्ठ नेते शरद पवार यांनी मध्यस्थी करून सुधारित धोरण आणण्याच्या सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना केल्या होत्या त्यानुसार गठीत करण्यात आलेल्या आयुष प्रसाद समितीने केलेल्या शिफारशीनुसार नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे.

या धोरणामुळे अनेक वर्षे दुर्गम भागात आपल्या तालुक्यापासून दुसऱ्या तालुक्यात काम करणाऱ्या महिला शिक्षक, पती पत्नी एकत्रीकरण, गंभीर आजाराने त्रस्त शिक्षक व इतर जिल्ह्यातून बदलून आलेले मात्र घराजवळ जाता न आलेल्या शिक्षकांना आता त्यांच्या तालुक्यात शाळा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दुर्गम भागात जाण्यास बरचसे शिक्षक अनुत्सुक असतात, त्यामुळे “पोहोच नसणाऱ्या” शिक्षकांना त्याठिकाणी वर्षानुवर्षे अडकून पडावे लागते, ही बाब मंत्री महोदयांच्या आणि आयुष प्रसाद समितीच्या निदर्शनास आणून देण्यात दुर्गम भागातील शिक्षक यशस्वी झाले

महाराष्ट्र राज्य दुर्गम क्रांती शिक्षक संघटनेच्या वतीने या नवीन बदली धोरणाचे स्वागत करण्यात आले आहे. नवीन शासन निर्णयानुसार या बदल्या लवकरात लवकर करण्यात याव्यात अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष श्री राहुल शिंदे गुरुजी यांनी केली आहे.

पुणे जिल्हा परिषदेकडे राज्याचे लक्ष :

नवीन बदली धोरण ठरवण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आयुष प्रसाद हे होते. त्यामुळे पुणे जिल्हा परिषद या निर्णयाची कशी अंमलबजावणी करते याकडे राज्याच्या ग्रामविकास विभागाचे लक्ष आहे. श्री आयुष प्रसाद हे आपल्या चोख, कार्यक्षम आणि पारदर्शक कारभारासाठी राज्यात प्रसिद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *