| नवी दिल्ली – लोकशक्ती ऑनलाईन | कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांना सहा महिन्यानंतर लस दिली जावी, अशी शिफारस काही दिवसांपूर्वी अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने (एनटीएजीआय) केली होती. याच समितीने आता कोरोनातून बरे झाल्याना नऊ महिन्यांनंतर लस देण्यात यावी, असे म्हटले आहे. गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना लस देण्याची शिफारस समितीने केली आहे.
लसीकरणासंदर्भात आवश्यक त्या शिफारशी करण्यासाठी केंद्र सरकारने एनटीएजीआयची स्थापना केलेली आहे.
यापूर्वी सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीच्या दोन डोसमधले अंतर १२ ते १६ आठवड्यांनी वाढवण्याचा सल्ला या समितीने दिला होता. एखाद्या व्यक्तीला दुसऱ्यांदा संसर्ग होऊ नये म्हणून दोन डोसमधले अंतर वाढवण्यात यावे, असे त्यावेळी समितीने सांगितले होते. याच समितीने आता सरकारला कोरोनामुक्त झालेल्यांचे लसीकरण कोरोनामुक्तीनंतर नऊ महिन्यांनी करण्यात यावे, असा सल्ला दिला आहे.
कोरोना संसर्ग झाल्यानंतर आणि पहिला डोस घेण्यामध्ये अधिक अंतर असेल तर शरीरामध्ये अॅण्टीबॉडीज तयार होण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढण्यासाठी फायदा होईल, असे समितीचे म्हणणे आहे. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनाही कोरोवरील लस द्यावी, असे समितीचे म्हणणे आहे. ज्या रुग्णांनी मोनोक्लोनल अॅण्टीबॉडीजच्या मदतीने किंवा कानव्हलेसंट प्लाझ्मा उपचारांच्या मदतीने कोरोनावर मात केली आहे, त्यांनी लसीचा डोस तीन महिन्यानंतर घेतला पाहिजे, असे एनटीएजीआयने स्पष्ट केले होते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .