पुणे मनपामध्ये नवीन २३ गावांचा समावेश, पुणे झाली सर्वात मोठी मनपा..!

| पुणे | पुणे शहराला लागून असलेल्या २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. यामुळे पुणे ही राज्यातील सर्वाधिक मोठी महापालिका ठरली आहे.

प्रशासनाच्या अंदाजानुसार, ही गावे समाविष्ट झाल्यामुळे महापालिकेची हद्द ४८५ चौरस किलोमीटर तर महसूल विभागाच्या दाव्यानुसार महापालिकेची ५१६ चौरस किलोमीटर एवढी झाली आहे. हवेली तालुका नागरी कृती समितीने शहरालगतची ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी केली होती.

त्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही गावे समाविष्ट करण्याचा निर्णय दिला. त्या नंतर राज्य सरकारने चार ऑक्टोबर २०१७ ला ३४ पैकी ११ गावांचा समावेश केला. उर्वरित २३ गावांचा टप्प्याटप्प्याने समावेश करण्याचा निर्णय घेतला होता.

ही २३ गावे समाविष्ट करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने तीन वर्षांची मुदत उच्च न्यायालयाकडे मागितली होती. ही मुदत ऑक्टोबरमध्ये संपली होती. राज्यातील सत्तांतरानंतर ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *