! मुंबई ! नववर्षानिमित्त राज्य सरकारनं भरतीबाबत गुड न्यूज दिली आहे. नवीन वर्षात आरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8 हजार विविध पदांसाठी मेगा भरती घेण्यात येणार आहे. दरम्यान आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभागातील रिक्त पदभरतीसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे राज्यातील विभागीय आयुक्तांसह आरोग्य अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. पुढील दोन महिन्यात ही भरती प्रक्रीया सुरू करण्याच्या सूचना यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहे. आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य सेवेशी निगडीत पदं भरली जाणार आहेत. राज्य शासनानं भरतीला मान्यता दिली आहे.
नव्या वर्षात महिलांसाठी राज्य सरकारकडून एक चांगली बातमी आहे. संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत पुरवण्यासाठी सुरू केलेल्या 181 हेल्पलाइन नव्या वर्षात पुन्हा स्वतंत्रपणे महिलांसाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील महिलांना आता चोवीस तास मदतीचा हात मिळणार आहे. महिला आणि बाल विकास विभागाने ऑगस्ट 2014 मध्ये 181 हेल्पलाइन सुरू केली असून हेल्पलाइनचे कॉल सेंटर मुंबईत आहे. दरम्यान या भरतीबाबत मराठा संघटना काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.