राहूल गांधी यांचे खोचक सवाल..!

| नवी दिल्ली | लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या चकमकीविषयी काँग्रेस नेता राहुल गांधी सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. शनिवारी सलग चौथ्या दिवशी राहुल गांधींनी ट्विट केले आहे. चीनच्या आक्रमणापुढे पंतप्रधानांनी सरेंडर केले.

राहुल यांनी विचारले की, जर ती जमीन चीनची होती तर तिथे भारतीय सैनिक का शहीद झाले आणि जवान शहीद कुठे झाले? गलवानमधील चीनचा हल्ला हा नियोजित कट होतास. सरकार गाढ झोपेत होते, त्यांनी समस्या समजून घेतली नाही. शहीद झालेल्या जवानांनी याची किंमत मोजावी लागली.

राहुल गांधी यांनी गुरुवारीही सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले होते की, आपल्या जवानांना निशस्त्र का पाठवण्यात आले? यासाठी कोण जबाबदारी आहे?

दोन दिवसांपूर्वी राहुल गांधींनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना डायरेक्ट प्रश्न केले होते. संरक्षण मंत्री म्हणाले होते की, गलवान खोऱ्यात आपले सैनिक शहीद झाल्याने दुःखी आहेत. दरम्यान तुम्ही चीनने नाव का घेत नाही. भारतीय सैन्याचा अपमान का करत आहात असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *