नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमदार गणेश नाईक साहेब, महापौर जयवंतजी सुतार साहेब, माजी महापौर सुधाकरजी सोनवणे साहेब तसेच अनंतजी सुतार साहेब आदींनी या निर्णयाकरिता मोलाचे सहकार्य केले.. तसेच आम्ही संघटनेच्या वतीने मा.आयुक्त अण्णासाहेब मिसाळ साहेब आणि मा. उप आयुक्त नितीन काळे साहेब यांचे आभार मानतो.
– सागरनाथ भंडारी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, नवी मुंबई |
---|
| नवी मुंबई | सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येणाऱ्या नकारात्मक गोष्टीमधून नवी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी एक गोष्ट घडली आहे, ती म्हणजे या सर्व कर्मचाऱ्यांना एप्रिल पेड मे च्या वेतनात सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. महापालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकांना देखील सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.
राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू होऊन बराच काळ उलटून देखील महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच मनपा, नपा यांना सातवा वेतन आयोग लागू नसल्याचे चित्र आहे. त्यात आता कोरोनामुळे सरकारची आर्थिक बाजू कोलमडली आहे , त्यामुळे सातवा आयोग नक्की केंव्हा लागू होईल याबाबत अधिकची धुसरता निर्माण झाली आहे. या काळात देखील आपल्या कर्मचाऱ्यांचे नैतिक धैर्य वाढविण्यासाठी महापालिकेने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वच स्तरातून आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची स्तुती होत आहे.
कसा झाला हा निर्णय :
महापालिकेने सातव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव जानेवारीत नगरविकास विभागाला पाठवला, त्यात त्रुटी निघाल्याने तो प्रस्ताव पुन्हा महापालिकेकडे परत आला. त्यात दुरुस्ती करून पाठवलेला प्रस्ताव मार्चच्या पहिल्या आठवड्यात मंजूर झाला. त्यावर महापालिकेने १३ मार्च रोजी आदेश काढून सगळ्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लावू करण्याचे पत्र काढले. त्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याची वेतन निश्चिती करून अखेर सातवा वेतन आयोग त्यांच्या वेतनात लागू झाला.
एका बाजूला विजू पाटील यांच्या नेतृत्वाखालील नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या प्रयत्नांमुळे महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू होत असताना प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत ५०% अनुदान हे राज्य सरकार देत असून ५०% अनुदान महापालिका देत असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी मुळे शिक्षकांना वेतन आयोग लागू करणेसाठी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने मा. पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माजी महापौर सुधाकरजी सोनवणे साहेब यांचेमार्फत केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे सचिव आत्माराम आग्रे यांनी लोकशक्तीशी बोलताना सांगितले.
संघटनेचे अध्यक्ष सागरनाथ भंडारी, संजय मोरे यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी मेहनत घेऊन वेतन पडताळणी करून महत्वाची भूमिका बजावली.
सदरहू वेतन आयोग शिक्षकांसाठी लागू करणेसाठी येणाऱ्या विविध अडचणी सोडवताना विस्तार अधिकारी श्रीम. रुतिका राजेंद्र संखे मॅडम यांनी प्रशासनाच्या सहकार्याने वेळोवेळी मंत्रालय व नगरपरिषद संचालनालय तसेच उपविभागीय उपसंचालक शिक्षण कार्यालय यांचेशी संपर्क साधून सातत्याने पाठपुरावा करुन शासन स्तरावरील तांत्रिक बाबी दूर केल्या. त्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे विशेष आभार!!!
| संजय मोरे, राज्य चिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ |
खूपच छान महत्वाचा निर्णय घेतला आहे अभिनंदन सर्व पदाधिकारी यांचे
इतर मनपांना कधी
Great decision.We need in TMC also with Bed scale.