विशेष लोकल सुरू करा..!

| ठाणे | राज्य सरकारचं मिशन बिगीन अगेन सुरू झाल्यानंतर नोकरदार वर्ग मोठ्या संख्येनं कामावर जाण्यासाठी बाहेर पडला आहे. बुधवारी सलग तिस-या दिवशी सुद्धा कल्याण डोंबिवलीत नोकरदारांचे हाल झाले. त्यासाठी मध्य रेल्वेने विशेष लोकल सोडाव्यात, अशी मागणी  करण्यात आली आहे.(Restart Local train)

डोंबिवली, दिवा आणि कल्याणमध्ये बससाठी भली मोठी रांग लागली होती. आजही या रांगेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळाले. डोंबिवलीत अगदी फडके रोडपर्यंत ही रांग गेली होती. तर दुसरीकडे कल्याण एसटी डेपोत बसमध्ये चढण्यासाठी नोकरदारांची एकच झुंबड झाल्याचं पाहायला मिळाले. मुंबईला दररोज किती लोक प्रवास करतात, याचा अंदाज आल्यानंतर तरी गर्दीच्या वेळी बसेसची संख्या वाढवण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

दरम्यान, या नोकरदारांसाठी अंतरनियम (सोशल डिस्टन्स) ची काळजी घेऊन काही विशेष लोकल्स सोडण्याची मागणी करण्यात येत आहे..(Restart Local train)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *