यंदा आयपीएल श्रीलंकेत होणार..?


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : १८ एप्रिल

मुंबई :  कोरोना  विषाणूमुळे देशभरातील वाढवण्यात आलेला लॉकडाऊन पाहता बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलचा तेरावा हंगाम स्थगित केला आहे. स्पर्धा सुरु करण्यासाठी योग्य वातावरण तयार होत नाही, तोपर्यंत स्पर्धा खेळवली जाणार नाही असं स्पष्टीकरण आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने परिपत्रक काढून दिलं आहे.

दरम्यान श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आयपीएलचा यंदाचा हंगाम श्रीलंकेत आयोजित करण्याची ऑफर बीसीसीआयला दिली आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. श्रीलंका देश भारतापूर्वी कोरोनाच्या परिस्थितीतून सावरेल, असे दिसत आहे. तसे झाल्यास आम्ही आयपीएल स्पर्धा श्रीलंकेत भरवू शकतो. यावर बीसीसीआयच्या उत्तराची आम्हाला प्रतीक्षा आहे, असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी म्हटले आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबर काळात होणारा नियोजित आयसीसी चषक आणि टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास त्या कालावधीत आयपीएलचे आयोजन करण्याचा विचार करत असल्याबाबत बोलले जात होते. आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाबाबतचा अंतिम निर्णय आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचा असेल.

त्यामुळे सद्यस्थितीत श्रीलंकेच्या बीसीसीआय सध्या एकूण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, भविष्यात स्पर्धा सुरु करण्याबाबत विचार झाल्यास केंद्र, राज्य सरकार आणि सर्व संबंधित यंत्रणांशी सल्लामसलत केल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असे बीसीसीआयने म्हटलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *