टी २० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलणार ..?

| क्रीडा विश्व | कोरोनामुळे टी-२० विश्वचषक स्थगित होणे निश्चित आहे. त्याची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होऊ शकते. २८ मे रोजी आयसीसीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होईल. अशात या स्पर्धेच्या आयाेजनाबाबत २८ मे किंवा त्यापूर्वी कोणता निर्णय येण्याची शक्यता आहे. या बैठकीत आयसीसीच्या अध्यक्ष निवडीवरदेखील चर्चा होऊ शकते. अध्यक्ष शशांक मनोहर यांचा कार्यकाळ या महिन्यात समाप्त होणार आहे. ऑस्ट्रेलियात स्पर्धा होणार असेल तर सर्व १६ संघांना क्वाॅरंटाइनमध्ये राहावे लागेल.

दरम्यान, विश्वचषकाला स्थगित करण्यामागे आम्ही नाही, असे BCCI ने म्हंटले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मध्यातील अहवालानुसार बीसीसीआय क्रिकेट ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर विश्वचषक स्थगित करण्यासाठी दबाव टाकत आहे. कारण आयपीएलला संधी मिळावी.  कोषाध्यक्ष अरुण धुमाळ याांनी म्हटले की, आम्ही विश्वचषक स्थगित करण्याचा सल्ला का द्यावा. आयसीसीच्या बैठकीत चर्चा होईल व तेच निर्णय घेतील. यासाठी काेणताही दबाव नाही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *