खासदार डॉ श्रीकांत शिंदे पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतीचे झालेले नुकसान भरपाईसाठी पंचनामे तातडीने करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश..!

| कल्याण | संपूर्ण राज्यात कोरोना (कोविड १९) चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामध्येच मागील आठवड्यात परतीचा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सध्या भातशेतीचे व इतर धान्याचे काढणीचे काम सुरु होते. मात्र पावसाने काढणीच्या कामात व्यत्यय येत असून पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने काढणी केलेले पिक, भाजीपाला, भातशेती व इत्यादी धान्यांना फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने ठाणे, कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. त्याचाच आढावा घेऊन शेतीचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दि.२० ऑक्टोंबर २०२० रोजी बाधीत क्षेत्राचा दौरा केला.

सदर दौऱ्यादरम्यान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी शिरढोण, बाळेगाव, वाकळण, दहिसर मोरी, मलंगवाडी, कुशिवली, आंबे, ढोके, खरड, मांगरूळ, नेवाळीपाडा आदी ग्रामीण भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांचे व्यथा जाणून घेतल्या व झालेल्या शेतीचे पंचनामे लवकरात लवकर करण्याचे तातडीचे आदेश त्यांनी दिले.

शेतकरी हातातोडांशी आलेला घास हिरवला कि काय या चिंतेत होते, परंतु ज्या- ज्या शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहेत, त्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देऊ असे ठाम आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सर्व शेतकऱ्यांना पाहणी दौऱ्यादरम्यान दिले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह संबधित शासकीय अधिकारी, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नेवाळी सरपंच चैनु जाधव, जिल्हापरिषद सदस्य रमेश पाटील, नगरसेवक रमाकांत मढवी, महेश गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *