| पुणे | कोरोनाची स्थिती पाहून ३० मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. पुण्यात काल विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आषाढी वारी बाबत बैठक पार पडली.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता त्यांची स्थिती पाहून ३० मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करुन देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटलं. . श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे, राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत पुढील पंधरा दिवसातील कोरोना स्थिती पाहून पुन्हा वारकरी सांप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करुन आणि विश्वासात घेवूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरुप कसे असावे, याबाबत आळंदी आणि देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार लॉकडाऊनचे स्वरुप पाहता श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पायी वारी आणि पालखी सोहळ्याच्या स्वरुपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सोलापूर, सातारा आणि पंढरपूर येथील मान्यवरांची आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतची मते विचारात घेतली जाणार आहेत. राज्य मंत्रीमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा केली जाणार असून त्यांनतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत वारकरी विश्वस्थांनी तीन पर्याय ठेवले होते:
- ३०० वारकरी घेऊन वारी करण्याची परवानगी द्या.
- २०० मानाचे दिंडीप्रमुख आणि विणेकरी यांना घेऊन वारी करण्याची परवानगी मिळावी.
- वाहनात पालखी घालून ४० वारकरी पंढरपुरला जातील.
या बैठकीमध्ये पालखी सोहळ्याचे स्वरुप, सहभागी वारकरी, सोशल डिस्टसिंग, प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याच्या आयोजनाबाबतचे पर्याय, पंढरपूर येथील नियोजन तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा