महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला ‘ ब्रेक ‘ लागणार..?
वारी पालखी सोहळ्याबाबत अनिश्चितता..!

आम्ही शासनासोबत - संस्थान विश्वस्त कमिटी
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाची नियमावली, लॉकडाऊन स्थिती आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण, दिंडी सोहळयाचे स्वरुप कशा प्रकारे करावे, या बाबत शासन देत असलेल्या निर्णयानुसारच नियोजन करण्यात येईल, तसेच शासन जो निर्णय घेईल त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करु, असे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील आणि देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे यांनी सांगितले.

| पुणे | कोरोनाची स्थिती पाहून ३० मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. पुण्यात काल विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आषाढी वारी बाबत बैठक पार पडली.

 कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता त्यांची स्थिती पाहून ३० मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करुन देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटलं. . श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे.  अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे, राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत पुढील पंधरा दिवसातील कोरोना स्थिती पाहून पुन्हा वारकरी सांप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करुन आणि विश्वासात घेवूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरुप कसे असावे, याबाबत आळंदी आणि देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार लॉकडाऊनचे स्वरुप पाहता श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पायी वारी आणि पालखी सोहळ्याच्या स्वरुपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सोलापूर, सातारा आणि पंढरपूर येथील मान्यवरांची आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतची मते विचारात घेतली जाणार आहेत. राज्य मंत्रीमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा केली जाणार असून त्यांनतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत वारकरी विश्वस्थांनी तीन पर्याय ठेवले होते:

  • ३०० वारकरी घेऊन वारी करण्याची परवानगी द्या.
  • २०० मानाचे दिंडीप्रमुख आणि विणेकरी यांना घेऊन वारी करण्याची परवानगी मिळावी.
  • वाहनात पालखी घालून ४० वारकरी पंढरपुरला जातील.

या बैठकीमध्ये पालखी सोहळ्याचे स्वरुप, सहभागी वारकरी, सोशल डिस्टसिंग, प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याच्या आयोजनाबाबतचे पर्याय, पंढरपूर येथील नियोजन तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *