पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून नागरिकांच्या सेवेसाठी आठ रुग्णवाहिका..

| पुणे | पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज आठ रुग्णवाहिका सामाजिक उद्देशाने प्रदान केल्या गेल्या. या पैकी पुणे, बारामती व कर्जत साठी दिलेल्या रुग्णवाहिका कार्डिअँक स्वरुपाच्या असून उर्वरित पाच रुग्णवाहिका साध्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी या रुग्णवाहिका आज पुणे येथे विधान भवन परिसर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान केल्या. या कार्यक्रम प्रसंगी शिरूर चे आमदार अशोक पवार , पारनेरचे आमदार निलेश लंके , पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतारे , माजी कृषी सभापती सुजाता पवार , बारामती नगर परिषदेचे जेष्ठ नगरसेवक किरण गुजर उपस्थित होते .

कोविडच्या काळात अनेकांना पुण्याला हलविताना रुग्णवाहिकांची नितांत गरज भासते. त्यातही कार्डिअँक रुग्णवाहिका वापरताना त्याला भरमसाठ भाडे आकारले जाते, जे भरणे सामान्यांना शक्य होत नाही. ही बाब विचारात घेत तीन कार्डिअँक रुग्णवाहिका व इतर पाच साध्या रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या आहेत.

भोर वेल्हा भागासाठी शिवाजीराव शिवतारे प्रतिष्ठानला, पारनेर अहमदनगरसाठी निलेश लंके प्रतिष्ठान, दौंडसाठी दौंड शुगर या कारखान्यास, शिरुर भागासाठी रावलक्ष्मी फाऊंडेशनला, कर्जत जामखेड विभागासाठी कर्जत जामखेड इंटीग्रेटेड डेव्हलपमेंट फाऊंडेशनला, इंदापूरच्या लोकांसाठी भगवानराव भरणे प्रतिष्ठान, बारामतीतील उपजिल्हा रुग्णालयास, तर पुणे शहरासाठी धनकवडी येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळास या रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या आहेत.

रुग्णांना वाजवी दरात रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, त्यांच्यावरचा आर्थिक बोजा कमी व्हावा या उद्देशाने ना नफा ना तोटा या तत्त्वावर या रुग्णवाहिका रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या रुग्णवाहिकांमुळे पुणे, बारामती, कर्जत, भोर वेल्हा, शिरुर, इंदापूर, अहमदनगर, दौंड या भागातील रुग्णांना दिलासा प्राप्त होणार आहे. सर्व सोयींनी सुसज्ज अशा या रुग्णवाहिका आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *